बोल्ट्झ फुटबॉल क्लब, पेगासेस एफसी, मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!
पुणे : हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सहाव्या अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धेत १० वर्षाखालील गटात बोल्ट्झ फुटबॉल क्लब, पेगासेस एफसी आणि मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.
हॉटफुट अॅकॅडमीच्या बावधन येथील मैदानावर झालेल्या १० वर्षाखालील गटाच्या सामन्यांमध्ये बोल्ट्झ फुटबॉल क्लब संघाने बिटा एफसीचा ४-० असा सहज पराभव केला. क्रिस्टेन सी. आणि रेहान पी. यांनी प्रत्येकी दोन गोल केले. पेगासेस एफसी संघाने गेम ऑफ गोल एफसी संघाचा ७-२ असा धुव्वा उडविला. प्रनत जोशी, आरव सरकार आणि अर्णव तेकाडे यांनी प्रत्येकी दोन गोल केले. गेम ऑफ गोल एफसी संघाकडून रूद्र जोशी आणि वेदांत कुलकर्णी यांनी गोल मारले. याच गटामध्ये मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमी संघाने जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी संघावर ४-० असा सहज विजय मिळवला. शौर्य रणदिवे याने २ तर, मल्हार देशमुख आणि नरेन प्रसाद यांनी एकेक गोल केले.
१२ वर्षाखालील गटाच्या सामन्यात लौकिक फुटबॉल अॅकॅडमी ब संघाने स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी संघाचा ३-२ असा सहज पराभव केला. अर्जुन जोशी याने दोन गोल तर, बादल सिंग याने एक गोल केला. स्टेपओव्हर संघाकडून विपूल शहा आणि वरद देशमुख यांनी गोल केले. प्रणव समुद्रे आणि कुशल बागळे यांच्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर उत्कर्ष क्रिडा मंच संघाने मॅथ्यु एफए संघाचा २-० असा पराभव केला. प्रणय संचेती, अनुराग प्रनासनी, अर्णभ भोसले यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर मॅथ्यु एफए संघाने लौकिक फुटबॉल अॅकॅडमी अ संघाचा ३-० असा पराभव केला.
१४ वर्षाखालील गटामध्ये जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी संघ, साई फुटबॉल अॅकॅडमी आणि ४ लायन्स् एफए अ संघांनी विजयी कामगिरी केली.
स्पर्धेचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः १० वर्षाखालील गटः
१) बोल्ट्झ फुटबॉल क्लबः ४ (क्रिस्टेन सी. २, रेहान पी. २) वि.वि. बिटा एफसीः ०;
२) पेगासेस एफसीः ७ (प्रनत जोशी २, विहान जैन, आरव सरकार २, अर्णव तेकाडे २) वि.वि. गेम ऑफ गोल एफसीः २ (रूद्र जोशी, वेदांत कुलकर्णी);
३) मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमीः ४ (शौर्य रणदिवे २, मल्हार देशमुख, नरेन प्रसाद) वि.वि. जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरीः ०;
१२ वर्षाखालील गटः
१) लौकिक फुटबॉल अॅकॅडमी बः ३ (अर्जुन जोशी २, बादल सिंग) वि.वि. स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीः२ (विपूल शहा, वरद देशमुख);
२) उत्कर्ष क्रिडा मंचः २ (प्रणव समुद्रे, कुशल बागळे) वि.वि. मॅथ्यु एफएः ०;
३) मॅथ्यु एफएः ३ (प्रणय संचेती, अनुराग प्रनासनी, अर्णभ भोसले) वि.वि. लौकिक फुटबॉल अॅकॅडमी अः ०;
४) पुणे एफसीः २ (शर्वरी माने, अर्जुन रद्दी) वि.वि. सिटी एफसीः ०;
१४ वर्षाखालील गटः
१) जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरीः ३ (स्वजीत जे. २, श्रीश एम.) वि.वि. उत्कर्ष क्रिडा मंच बः १ (नवमी शानबाग);
२) साई फुटबॉल अॅकॅडमीः ९ (उत्कर्ष सुतार ३, शौय शिंदे २, आर्य वासुदेव, यश नेवलीकर, वीर मांगुरडेकर, अर्थव दोरखाडे);
३) ४ लायन्स् एफए अः ४ (अर्जुन सिंग २, रचित सिंग, शौनक सी.) वि.वि. मॅथ्यु एफएः ०;
