Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

एंजल वनच्या ग्राहकसंख्येत वार्षिक ७१.५ टक्क्यांची वाढ

 

~ ग्राहकसंख्या ११.८८ दशलक्षांवर पोहोचली ~

मुंबई : फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडची ग्राहक संख्या ऑक्टोबर २०२२ मध्ये वार्षिक ७१.५ टक्क्यांच्या वाढीसह ११.८८ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामध्ये एकूण क्लायण्ट संपादन ०.३४ दशलक्ष आहे. कंपनीने वार्षिक १९.० टक्क्यांच्या वाढीसह ६९.४२ दशलक्ष ऑर्डर्ससह प्रबळ व्यवसाय कामगिरी केली.

एंजल वनची सरासरी दैनिक उलाढाल वार्षिक ११०.७ टक्क्यांच्या वाढीसह १३.८८ ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचली. ऑक्टोबर २०२२ मध्ये एकूण रिटेल इक्विटी उलाढालीमध्ये कंपनीचा मार्केट शेअर वार्षिक ९७ बीपीएस विस्तारासह २१.७ टक्क्यांनी वाढला आणि सरासरी क्लायण्ट फंडिंग बुक १५.७५ बिलियन रूपये राहिले.

एंजल वन लिमिटेडचे यीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, ‘’इक्विटींमधील रिटेल सहभाग प्रबळ आहे. अधिकाधिक लोकांना पारंपारिक मालमत्तांच्या तुलनेत आर्थिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याची माहिती मिळत आहे. द्वितीय, तृतीय श्रेणीच्या व त्यापलीकडील शहरांमधील तरूणांशी संलग्न होण्याचे आमचे धोरण दुर्लक्षित विभागांमधील लोकांना सक्षम करते.’’

एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आम्ही भारतातील कमी सेवा उपलब्ध असलेल्या भागांमधील अधिकाधिक ग्राहक मिळवण्याच्या आमच्या प्रयत्नात सातत्य ठेवले आहे. आमचे तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले धोरण देशात अधिक डीमॅट खाती उघडण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. अधिकाधिक लोकांना दर्जात्मक गुंतवणूकीचे उपाय प्रदान करणे आणि भारतीय भांडवली बाजाराच्या वाढीस हातभार लावणे हे आमचे ध्येय आहे. आमची डिजिटली सुधारित उत्पादने हे ध्येय साध्य करत आहेत.”

या वर्षाच्या सुरूवातीला एंजन वनने पाच प्रमुख आधारस्तंभ (एस.टी.ए.आर.एस.) – सुलभता , पारदर्शकता, उपलब्धता, खात्रीशीरता आणि चपळता यावर आधारित सुपर अॅप लॉन्च केले. अॅपमधील अत्याधुनिक उत्पादने व सेवा विश्वसनीय, प्रभावी व वैयक्तिकृत गुंतवणूक अनुभव देतात. हे अॅप वेब व आयओएस व्हर्जन्सवर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading