fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

रुपालीचे सत्य अद्वैत ला सांगू शकेल का नेत्रा?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. कारण नेत्राला मिळत असलेल्या संकेतानुसार ती रुपालीचा भूतकाळ जाणून घ्यायचं ठरवते. नेत्राला लहानपणीच्या अव्दैतचा कुणीतरी गळा दाबत असल्याचं दिसतं. शेखरमुळे नेत्राला कळतं की लहानपणापासूनच कुणीतरी अव्दैतला मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता रुपाली अव्दैतला हाताशी धरुन नेत्राला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण अव्दैत नेत्राचं कौतुक करतो. त्यामुळे रुपाली एकदम आश्चर्यचकित होते आणि आपलं खरं रुप सगळ्यांना कळलंय, असं तिला स्वप्न पडतं. ती लगेच आजोबांच्या खोलीत येते. त्यानंतर रुपाली आणि बंटी आजोबांना मारायची नियोजन करू  लागतात. परंतु नेत्राला हे सगळं संकेतामध्ये दिसतं आणि नेत्रा आजोबांना वाचवते. या सर्वप्रकारानंतर  नेत्रा रुपातलीचा खरा चेहरा सर्वांसमोर करू शकेल? हे पाहणे रोमांचक असणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. सोमवार ते शनिवार संध्या १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading