Friday, August 28, 2026
Latest NewsMAHARASHTRA

संजय राऊत यांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

मुंबई:आज मातोश्री, बांद्रा येथे दिनांक १० नोव्हेंबर, २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मीवहिनी, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांचे स्वागत आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे यांना देखील यावेळी शिवसेना पक्षाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी पुढील वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी खा. विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आ. सुनिल राऊत, स्विय सहायक रवी म्हात्रे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संजय राऊत यांच्या पुनरागमन झाल्याने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading