केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामती लोकसभा मंतदारसंघांच्या दौऱ्यावर
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा भाजपाने लोकसभा निवडणुकांच्या तयारी करताना विशेष लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर दिल्याचे मिळते.
भाजप नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात बारामतीतील दुसरा दौरा आयोजित करण्यात येत आहे. निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याच्या पूर्वतयारीला आतापासूनच सुरूवात करण्यात आल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.
या दौऱ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी मुक्कामी येणार आहेत. 11 तारखेला खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरीवरुन पटेल हे बारामती येथे येणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यासाठी सुरुवात केल्याचे यला मिळते.
दरम्यान, प्रल्हाद सिंह पटेल यांच्यासमवेत भाजप आमदार राम शिंदे, गणेश भेगडे, वासुदेव काळे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच पटेल हे १२ नोव्हेंबर रोजी इंदापूर, भिगवण, दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर कौन्सिल हॉल पुणे येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.
