Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

पीएमपी अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांचेकडून नाट्य सेवा संघातील कलाकारांचे अभिनंदन

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नाट्य सेवा संघाने ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये ‘प्रश्न कायद्याचा आहे’ हे नाटक सादर करून या नाटकासाठी पुरुष व स्त्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. याबद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी गुणवत्ता प्राप्त कलाकारांसह
पीएमपीएमएलच्या नाट्य सेवा संघातील सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.

पीएमपीएमएलच्या नाट्य सेवा संघाची वाटचाल गेली २८ वर्षे अविरतपणे सुरू आहे. नाट्य सेवा संघाने एकांकिका
स्पर्धेपासून सुरुवात करून दोन अंकी नाटक व त्यानंतर महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा व महाराष्ट्र कामगार कल्याण
मंडळाच्या नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेत सन २०२१-२२ पर्यंत रंगमंचावर तब्बल २८ नाटके सादर केलेली आहेत. व्यावसायिक
रंगभूमीवर गाजलेली अनेक नाटके पीएमपीएमएलच्या नाट्य सेवा संघाने रंगमंचावर सादर केली आहेत. सन २००३-०४
मध्ये “घरघर” नाटकाला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळून या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. तर “फॉरमॅट”
(२०११-१२), “खेळ” (२०१२-१३), “धुवाँ” (२०१६-१७), “प्रश्न कायद्याचा आहे” (२०२०-२१) या नाटकांना विभागीय
स्तरावर द्वितीय पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. तसेच २०१४-१५ मध्ये अधांतर या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले
होते.

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी पीएमपीएमएल नाट्य
सेवा संघाने आतापर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल पीएमपीएमएल चे कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे यांचे
मार्गदर्शनाखाली नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेणारे विनोद जंबुकर, दिलीप आंग्रे, उमेश शेंडगे, नितीन पगारे, देविदास धायगुडे,
अशोक बोरसे, हेमांगी काळे व नाट्य सेवा संघाची धुरा सांभाळणारे राजेंद्रकुमार यादव आदी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading