प्रतिकूल परस्थितीतही यशाचे शिखर गाठता येते- शत्रुघ्न सिन्हा
फिक्की महिला उद्योजिका परिषदेत सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ व शत्रुघ्न सिन्हा यांनी महिलांना प्रोत्साहन देत केले मार्गदर्शन —
पुणे : रंग ,रूप व कोणताही वारसा नसताना सुद्धा मी चित्रपट विश्वात व नंतर राजकारणात सुद्धा खूप यशस्वी झालो ,त्यामुळे महिलांनीही कला ,क्रीडा व उद्योग यासह विविध क्षेत्रात जिद्द आणि प्रचंड
महत्वकांक्षा ठेवल्यास प्रतिकूल परस्थितीतही यशाचे शिखर गाठू शकता असा विश्वास महिला उद्योजिकांना सुप्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिला .ते पुण्यात फिक्की महिला उद्योजिका परिषदेत बोलत होते .
यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटना आणि आठवणी उपस्थित महिलांना सांगितल्या .तसेच महिलांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे देत संवादही साधला .
या वेळी अभिनेते जॅकी श्रॉफ व शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करून त्यांना फिक्की पुणे च्या वातीने विशेष पुरस्कार देण्यात आले .
यावेळी फिक्की पुणे च्या अध्यक्षा निलम सेवलेकर यांनी त्यांचे स्वागत केले .यावेळी फिक्की महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया ,पुणे अध्यक्षा निलम सेवलेकर ,उपाध्यक्षा रेखा मगर ,खजिनदार सोनिया राव ,पिंकी राजपाल यासह फिक्की पदाधिकारी देशभरातील महिला उद्योजिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
