Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

सुनील पूर्णपात्रे यांची सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड

पुणे : सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी सुनील पूर्णपात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे. रवींद्र सोनावणे यांची सचिवपदी तर खजिनदारपदी अनिल उलांडे यांची निवड झाली आहे.

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी कार्यकारी सभासदांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे सरचिटणीस व अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश भागवतराव गायकवाड, शरद मडके उपस्थित होते. निरीक्षक म्हणून अमॅच्युअर सॉफ्ट टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नागराव मकवाना, कार्यकारी संचालक नटवरलाल वेगडा, महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे उपसचिव डॉ. दयानंद कुमार यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading