Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

‘यूं सजा चांद’ या नृत्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन   

पुणे  : संगीत, नाटक, नृत्य अशा कला आपलं जगणं समृद्ध करतात या जाणीवेतून बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर यांच्या पुढाकारातून  येत्या रविवारी, दिनांक १३ नोव्हेंबर रोजी ‘यूं सजा चांद’ या या नृत्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ कथक नृत्यांगना मधुरिता सारंगपं. राजेंद्र गंगानी यांच्या शिष्या आणि कथक नृत्यांगना श्रद्धा हर्डीकर-शिंदे आणि अर्चना अनुराधा या आपल्या ३० सहकाऱ्यांसोबत नृत्य प्रस्तुती करतील. हा कार्यक्रम विधी महाविद्यालय रस्ता येथील भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिटयूट’च्या अँफिथिएटर येथे सायंकाळी ७ वाजता होईल. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिका ८ नोव्हेंबरपासून ‘विलास जावडेकर डेव्हलपर्स’च्या कोथरूड, सूस तसेच वाकड येथील कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपलब्ध असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading