अभिनेता अभिषेक बच्चन यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे स्वागत व सन्मान
पुणे : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनी मंगळवारी सकाळी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यासोबतच श्रीं ची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती देखील जाणून घेतली.
