fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

भारतातला पसंतीचा चेकआउट भागीदार Simpl सह झोमॅलँडचे पुण्यात पदार्पण

नवी दिल्ली : झोमॅटो द्वारे झोमॅलँड २२ साठी पसंतीचा पेमेंट पार्टनर असल्याचे भारताचा पसंतीचा चेकआउट भागीदार Simpl  ने जाहीर केले आहे. झोमॅलँड २२ चे पुणे सत्र ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी लॉन्स येथे होणार असून लोक कार्निव्हलची तिकिटे बुक करण्यासाठी Simpl चा वापर करू शकतात.

झोमॅलँड २२ मध्ये Simpl सह करा मजा

दोन दिवसीय झोमॅलँड २२ कार्निव्हल पुणे शहरातील ६० हून अधिक प्रसिद्ध रेस्टॉरंट्सचे आयोजन करेल. या कार्निव्हलला भेट देणारे शार्क टँक फेम – थेका कॉफी आणि द क्रंच अफेअरचा आनंद घेऊ शकतात. ते हंगेरियन स्ट्रीट फूड सर्व्ह करतील. मलाका स्पाइसचे ड्रम रोल, लिटल इटली, मर्फीज, मराठा सम्राट, मजावी बिर्याणी आणि बरेच काही, एमएच १२ पाव भाजी, कॅफे अरेबियाचे सौक आणि टेल्स अँड स्पिरिट्स यांचा इतर पसंतीच्या गोष्टींमध्ये समावेश आहे.

Simpl एक आईस्क्रीम ट्रक, मिनी गोल्फ सारखे खेळ आणि बऱ्याच इतर गोष्टींसह एक ‘सिंपल झोन’ देखील होस्ट करेल. विजेत्यांना फ्रोझन बॉटलचा आनंद लुटता येईल तर Simpl अॅप वापरकर्त्यांना १ रुपयामध्ये आइस्क्रीम आणि इतर गोष्टींचा आनंद घेता येईल.

झोमॅलँड कार्निव्हलमध्ये अरमान मल्लिक, वीर दास, एमिवे बांटाई, रित्विज, कायन आणि इतर अनेक कलाकारांचे कार्यक्रम देखील असतील! झोमॅटो द्वारे झोमॅलँड हा भारतातील सर्वात भव्य खाद्य आणि मनोरंजन कार्निव्हल आहे जो ३५० हून अधिक खाद्यपदार्थ, उत्कृष्ट मनोरंजन आणि मजेदार कार्निव्हल गेम्ससह सात भारतीय शहरांमध्ये  आयोजित केला जाईल.

Simpl- झोमॅलँड सहयोगाद्वारे, लोक त्यांची तिकिटे बुक करण्यासाठी आणि भारतातील सर्वात मोठ्या कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी Simpl चे अखंड चेकआउट नेटवर्क वापरू शकतात. पुण्यापासून, झोमॅलँडचा प्रवास इतर भारतीय शहरांमध्ये होईल. त्यामध्ये फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकाता यांचा समावेश राहील.

“नोव्हेंबरमध्ये पुण्यात सुरू होणार्‍या झोमॅलँडसाठी अधिकृत भागीदार म्हणून काम करताना आम्हांला आनंद होत आहे. पुणेकर नेहमीच त्यांच्या साहसी भावनेसाठी ओळखले जातात. खासकरून जेव्हा जेवण आणि चांगल्या पद्धतीने वेळ घालविण्याची वेळ येते तेव्हा तर ही गोष्ट खूपच अधोरेखित होते.  उत्तम कार्यक्रमांच्या सह यंदाचा झोमॅलँड तुमच्या खवय्येगिरीला पुरेपूर वाव देईल आणि तुमची ऊर्जा पातळी उच्च ठेवेल. झोमॅलँड चे पसंतीचे पेमेंट पार्टनर म्हणून Simpl तुम्हाला कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी तिकिटे बुक करणे, शोसाठी पैसे भरणे आणि इतर सेवा पुरवेल. तुम्ही आमच्या Simpl नेटवर्कवर उपलब्ध असलेल्या २०,००० हून अधिक ब्रँडमधून खरेदी करू शकता,” असे Simplचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक नित्य शर्मा म्हणाले.

“आम्ही बऱ्याच काळापासून झोमॅटोचे चेकआउट भागीदार आहोत. आमची काही समान मूल्ये आहेत:  पहिलं म्हणजे ग्राहक प्रथम दृष्टीकोन जो नावीन्यपूर्ण-केंद्रित आहे आणि ग्राहकांना विना तक्रार अनुभव मिळेल हे सुनिश्चित करण्यावर भर आहे. त्यामुळे आम्हाला हे सहकार्य वाढवणे आणि या वर्षीच्या सत्रासाठी झोमॅलँडचा पसंतीचा भागीदार म्हणून काम करणे हे खूप अर्थपूर्ण आहे,” नित्य शर्मा यांनी झोमॅलँड कार्निव्हलसोबतच्या भागीदारीवर भाष्य करताना सांगितले.

“आम्ही Simpl ला आमचा पसंतीचा पेमेंट पार्टनर म्हणून झोमॅलँड साठी आणताना खूप भारावून गेलो  आहोत. ग्राहक आणि डिजिटल फर्स्ट प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी जागतिक दर्जाचा अनुभव निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. Simpl च्या अग्रगण्य उत्पादनासह आम्हाला उपस्थितांना कार्निव्हलचा लवचिक आणि त्रास मुक्त अनुभव देत आमच्या व्यापाऱ्यांनाही सक्षम करताना आनंद होत आहे,” असे झोमॅटो लाईव्हचे ग्लोबल हेड चैतन्य माथूर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading