Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरातील ‘या’भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे:वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीतील गांधी भवन टाकी आणि चांदणी चौक टाकीच्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मिटर बसवण्यात येणार आहे. या यानंतर कामाचे नियोजन करण्यात येणार असल्याने बुधवारी रात्री 10 ते गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे वारजे जलकेंद्राच्या आखत्यारीत येणाऱ्या भागाचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.तसेच शुक्रवारी सकळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, व्हिल व्ह्यू, गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुल नगर, बी.एस.यु.पी. स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरुड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्न्हल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन 7 व 9, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर.
चांदणी चौक (चोकोनी) टाकी परिसर – पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती,
सँटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी,
चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर,
सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर,
परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वर वाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर इ.

पॅन कार्ड क्लब GSR टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड,
पल्लोड फार्म, शिंदे पाखरे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इत्यादी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading