Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत एच. ए. स्कूलला विजेतेपद

पुणे – मराठी विज्ञान परिषदेच्या मुंबई शाखेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स माध्यमिक स्कूलच्या (एच. ए.) ‘द बिगिनिंग’ या एकांकिकेला चार वैयक्तिक पारितोषिकांसह विजेतेपद मिळाले.

शिक्षक जगदीश पवार यांना लेखन, दिग्दर्शन आणि प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांकाची तीन पारितोषिके आणि सृष्टी पाटील या विद्यार्थिनीला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. आदिती झरकर, सृष्टी पाटील, हर्षदा वाघचौरे, सृष्टी भागवत, ऋषभराज सिंह, सौम्य साबळे आणि तन्वी हनपुडे या विद्यार्थ्यांचा विजयी संघात समावेश होता.

रोख एकतीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. सहभागी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त 15 गुण मिळणार आहेत. मंगल साठे, रमेश गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वृत्तनिवेदिका शिबानी जोशी आणि दिग्दर्शक देवेंद्र प्रेम यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, शालाप्रमुख एकनाथ बुरसे, उपशालाप्रमुख दीपा अभ्यंकर, पर्यवेक्षिका आशा बनसोडे व सुनीता पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading