Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव-रंगावलीतून विश्वशांतीचा संदेश

पुणे : आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावटअशा मंगलमय, धार्मिक वातावरणासह फुलांच्या रंगावलीतून विश्वशांतीचा संदेश देणारी सामाजिक जोड यामुळे सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरातील वातावरण भारावून गेले होते़ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे  या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त, पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिला विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभागी झाल्या होत्या़ सुगंधी फुलांच्या मध्यभागी विश्वशांतीचा संदेश फुलांमधूनच साकारला होता़ तर, रंगीबेरंगी पणत्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, आपण भौतिक व मानसिक अशा अशांततेच्या वातावरणात वावरत आहोत. सर्वत्र शांततेसाठी शोधाशोध सुरु आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मानवतेसाठी शांततेचा संदेश दिला आहे. जगभरात देखील संघर्षाचे वातावरण सुरु आहे. त्यामुळे भारतासह जगभरात शांतता नांदावी, याकरिता विश्वशांतीचा संदेश देणारी रंगावली साकारण्यात आली होती. तसेच दीपोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण जग सुख-समृद्धधीने उजळून निघू दे, अशी प्रार्थना देवीचरणी करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading