Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

डॉ. अविनाश सोवनी लिखित तीन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न 

पुणे : डॉ.अविनाश सोवनी लिखित आणि मर्वेन टेक्नॉलॉजीज प्रकाशित मराठा कालखंडातील नगरविकास, आडबंदरचा रुद्रकोट आणि जिर्णोद्धार या तीन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे झाला. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, जेष्ठ इतिहास संशोधक  गजानन मेहंदळे लेखक डॉ. अविनाश सोवनी, मर्वेन टेक्नॉलॉजीचे संचालक मनोज केळकर यावेळी उपस्थित होते.

गजानन  मेहेंदळे यांनी इतिहास संशोधनातील, बोलके आणि मूक साक्षीदारांचे महत्त्व विविध उदाहरणांसह समजावून सांगितले.

प्रदीप रावत म्हणाले, मराठा कालखंडाचा वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास झाला पाहिजे. वेगळी वैशिष्ट्ये अभ्यासली पाहिजेत, असे करूनच मराठा इतिहासाचे दालन समृद्ध होईल. इतिहासाबाबत गैरसमज होण्याच्या काळात वस्तुनिष्ठ इतिहास समोर यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

डॉ.अविनाश सोवनी म्हणाले, मराठ्यांना  नगररचेचे ज्ञान नव्हते असे समजणे अजिबातच बरोबर नाही. मराठा नगररचनाकारांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गावागावांचा विकास केला.
मराठा कालखंडात नगर विकास आणि नगर रचना या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.
तसेच, जीर्णोद्धार या कादंबरीविषयी ते म्हणाले, अलीकडच्या काळात आधुनिकीकरणाच्या नावाखाली खेडोपाडी छोटी छोटी देऊळे पाडली जातात, परंतु असे केल्यामुळे आपला ऐतिहासिक वारसा पुसून टाकला जात आहे हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणूनच कोणत्याही ऐतिहासिक वास्तूंचा  जीर्णोद्धार करताना अनेक पथ्य कशा पद्धतीने पाळली पाहिजेत हे या कादंबरीत विषद केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading