सुकांत कदमचे ब्राँझपदकावर समाधान
पुणे ः जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सुकांत कदमनला एसएल-४ विभागात अखेर ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य फेरीच्या लढतीत शनिवारी सुकांतला इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटिआवानकडून २०-२२, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.
टोक्यो येथे ही स्पर्धा सुरु आहे. जागतिक स्पर्धेत दुसऱ्यांदा सुकांतला ब्राँझपदकावर समादन मानावे लागले.
जागतिक स्पर्धेत तो दुसऱ्यांदा फ्रेडीकडून पराभूत झाला. यापूर्वी २०१७ मध्ये कोरियाच झालेल्या स्पर्धेतही फ्रेडीने सुकांतला पराभूत केले होते.
सुकांतला कारकिर्दीत आतापर्यंत एकही सामना फ्रेडीविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही.
आतापर्यंत झालेल्या सहाही लढती फ्रेडीने जिंकल्या आहेत. पराभवानंतर सुकांत म्हणाला, मला आवश्यक त्या जोशाने खेळता आले नाही. आतापर्यंत आमच्यात खूप चुरशीच्या लढती झाल्या, पण, आज मला लयच गवसली नाही.
