Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

लेटर वॉर नंतर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केली पाहणी

पुणे:शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेले असताना अखेर महापालिका आणि पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी समन्वयातून कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच पहिला टप्पा म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज गणेश खिंड रस्ता, चांदणी चौक, सिंहगड रस्‍त्यावरील उड्डाणपूल, मेट्रोच्या कामाची पाहणी केली. उड्डाणपुलाचे ठेकेदार काम नसतानाही विनाकारण बॅरिकेडींग करून रस्ता अडवत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा असे आदेश या दोन्ही आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.

विकासकामांसाठी खोदण्यात येणारे रस्ते, बंद पडलेले सिग्नल, गर्दीच्या ठिकाणांलगत पदपथांची दुरूस्ती, मेट्रो आणि उड्डाणपुल परिसरातील अतिरिक्त वॉर्डनची नियुक्ती, खड्डे भरण्यासाठी प्राधान्य, सिग्नल वेळ मर्यादा, परिसरातील चोहीबाजूंनी येणाNया वाहतूकीनुसार नियोजनाविषयी महापालिका प्रशासनासह पुणे वाहतूक पोलिसांकडून संयुक्तरित्या पाहणी करण्यात आली आहे. त्याबाबत दोन्ही विभागाकडून एकमेकांना सहकार्य करीत वाहतूक नियमनास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी तातडीने कामे करण्यात येणार आहे. त्याशिवाय गर्दीनुसार वॉर्डन, वाहतूक अमलदार अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाणार आहे. दरम्यान, दिवाळीनंतर आता शहरात पुन्हा एकदा चाकरमानी माघारी परतले आहेत. त्यामुळे चौकाचौकात वाहतूक वर्दळ नियमीत ठेवण्याची जबाबदारी अमदारासह अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
यावेळी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, महापालिकेचे मुख्य प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभागाचे प्रमुख व्हि.जी. कुलकर्णी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading