Thursday, August 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू: घटनेची माहिती मला मीडियातून मिळाली – गौतमी पाटील

पुणे लावणीतच्या नावाखाली अश्लील नृत्य करण्याच्या वादानंतर गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रभर चर्चेत आले आहे. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी गौतमीची कानउघाडणी केली होती. आता आणखी एकाचा मृत्यू कार्यक्रमामुळे गौतमी पाटील चर्चेत आली :आहे. सांगलीमध्ये एका लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.
मला या संदर्भात कोणाचाही फोन आला नाही. मी बातमी वाचल्यानंतर मला याची माहिती मिळाली. ते वयस्कर होते आणि त्यांच्या मृत्यूने मलाही वाईट वाटलं आहे. मला अंदाजच नव्हता की एवढा विषय होईल. मला कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. त्यामुळे मी माझं काम केले. पण हे असं होईल मला तरी वाटलं नव्हतं. माझा डान्स सुरु होता. पण कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला कळालं की एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. असे गौतमी पाटीलने म्हटलं आहे.
गौतमीने आपल्या कुटुंबाविषयी माहिती दिली. तसेच ‘माझ्या घरची परिस्थिती अंत्यत हालाकीची असून कुटुंबाला सांभाळ्यासाठी मला शिक्षण सोडून द्यावे लागले. तसेच सुरुवातीला मी नृत्याचे प्रशिक्षण घेतं होती,परंतु आई वारल्याने कुटुंबाच्या जबाबदारीमुळे मी ते अर्धवट सोडले आणि बॅकडान्सर म्हणून काम सुरु केले ‘असे गौतमीने सांगितले.
गौतमीने केलेल्या अश्लील नृत्याबद्दल बोलताना गौतमीने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading