Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह पुढच्या महिन्यात पुणे दौऱ्यावर

पुणे:राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात पुण्यात येणार आहेत.
त्यामुळे मनसे अध्यक्ष विरुद्ध खासदार ब्रिजभूषण सिंह असा वेगळाच सामना आता रंगणार आहे. ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. येत्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. पुण्याची माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र कुस्तीच्या या स्पर्धांवरून आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.
2022 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आयोजित केला होता. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात जे आंदोलन केलं होतं, त्यासाठी आधी समस्त उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागा, अशी भूमिका उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती.
राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात आले तर ते सहि सलामत परतू शकणार नाहीत, असे आव्हान ब्रिजभूषण सिंह यांनी दिलं होतं. एकिकडे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरु असताना ब्रिजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानाची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती.
ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून वारंवार दिली जाणारी आव्हानं पाहून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. मात्र आता महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेला ब्रिजभूषण सिंह येणार आहेत. त्यामुळे मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading