सौरभचा जीव वाचवू शकेल अनामिका?
सौरभ कामाच्या निमित्ताने अमेरिकेला गेलाय. इकडे तो नसताना अनामिका वाड्यात राहायला येते. सौरभने आकाश पासून संरक्षण व्हावं यासाठी सचिन, चंदु आणि नीलला सतत अनामिकाच्या सोबत राहण्याची ताकीद दिली आहे.आकाश वाड्यातील लोकांना येनकेन प्रकारे त्रास देतच आहे. अनामिका मात्र या सगळ्याला पुरून उरते . वाड्यावर उत्साहात दिवाळी साजरी केली जातेय, सौरभ आणि अनामिका यांचा ऑनलाईन पाडवा होतो तर अनामिका भाऊबीजे निमित्त सचिनला ओवाळते. तसेच आपण प्रोमो मध्ये पहिल की आकाश सौरभला ताब्यात घेतो आणि दुसरीकडे अनामिकाला फोन लावून धमकावतो. सौरभचा जीव वाचवू शकेल अनामिका? हे पाहणे खूप औत्सुक्याचं असणार आहे.
तेव्हा बघायला विसरू नका ‘तू तेव्हा तशी’ २ तासांचा विशेष भाग, येत्या ६ नोव्हेंबर,रविवारी संध्या ७ वा. आणि ७ नोव्हेंबरपासून नव्या वेळेत सोमवार ते शनिवार रात्री ११ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
