Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – लुल्लानगर भागातील ZK हॉटेलच्या इमारतीला भीषण आग

पुणे: शहरातील लुल्लानगर भागातील झीके(जहीर खान) हॉटेलला आजसकाळी आग लागली आहे. या आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.
सात मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ही संपूर्ण काचेची इमारत असल्याने इमारतीमध्ये मोठ्याप्रमाणावर धूर पसरला आहे. धूर बाहेर पडण्यास पुरेसी जागा नसल्याचे दिसत आहे. परिणामी धूर बाहेर पडावा यासाठी इमरातीच्या काचाही फोडल्या जात आहेत. या इमरतीतमध्ये विविध कार्यालये तसेच सराफा व्यावसायिकांची दुकानेही आहेत.
प्राथमिक माहिती अशी सुद्धा आहे की या हॉटेलमध्ये काम करणारे काही कर्मचारी हे रात्री त्याच हॉटेलमध्ये झोपतात. त्यामुळे ते जर आत असतील तर निश्चितच ही अधिक चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे.
. या आगीत हॉटेलचं मोठं नुकसान झालंय. मात्र घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अद्याप अधिकृत माहिती प्रशासनानतर्फे देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading