सिंहगड रोड जनता वसाहत संभाजी ब्रिगेड शाखेचे उद्घाटन
पुणे : देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता या संभाजी ब्रिगेडच्या घोषवाक्यानुसार पुणे शहरांमध्ये शहराध्यक्ष अविनाश मोहिते.यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागामध्ये गल्लीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या शाखा स्थापन करण्यात येणार आहे घर तिथे कार्यकर्ता तयार केला जाणार आहे.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर व प्रदेशाध्यक्ष Ad. मनोज आखरे. महाराष्ट्राचे सचिव सौरभ खेडेकर साहेब. यांचे हात बळकट करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सदैव तत्पर आहे. व शिव, शाहू,फुले, आंबेडकर, या महामानवांचे विचार सर्व सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी घर तिथे कार्यकर्ता व गाव तिथे शाखा काढल्या जातील. सर्व तरुणांच्या हातात लेखणी देऊन त्यांचा मन, मनगट, मेंदू मनका, सशक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. तरुणांच्या हातातील दगड खाली ठेवून त्यांच्या हातात पुस्तके देण्याचा प्रयत्न केला जाईल.वैचारिक तरुणांचा संघटन पुणे शहरांमध्ये काही दिवसात तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गोरगरिबांच्या,कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, वंचितांचा, पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड प्रमुख भूमिका शहरात बजावील. व सामान्य जनतेचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पुणे महानगरपालिके वरती संभाजी ब्रिगेड व शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं स्वप्न जे खेडेकर साहेबांनी पाहिलं ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.असे प्रतिपादन शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले.व काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पर्वती विभाग अध्यक्ष म्हणून वेंकट मानपिडे .यांची नियुक्ती करण्यात आली.महिला आघाडी पर्वती विभाग अध्यक्ष म्हणून सारिका अविनाश घोडके .यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे जनता वसाहत शाखाध्यक्ष म्हणून रंजीत लंगर. व उपाध्यक्ष म्हणून समाधान घोडके. यांच्या नियुक्त्या करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रदेश संघटक संतोष शिंदे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे. महानगराध्यक्ष अविनाश भाऊ मोहिते पाटील.हे प्रमुख उपस्थित होते.
तसेच पुणे शहर उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे. सचिव संदीप कारेकर. कार्याध्यक्ष अविनाश घोडके. सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर. कुमार पवार. माया पवार नरेश पडवळ. शंकर तात्या कुटे. अमर गजघाटे. हे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
