Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांची डाॅ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स च्या संचालकपदी नियुक्ती

पुणे:आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांची नुकतीच डॉक्टर.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स या विभागाचे संचालक म्हणून डॉक्टर.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ.पी.डी.पाटील यांनी नियुक्ती केली. डाॅ.कपोते यांना नियुक्ती चे पत्र डॉक्टर.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.एन.जे.पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी डाॅ.नरेन्द्र कडू उपस्थित होते. डॉक्टर.डी.वाय.पाटील विद्यापीठा मध्ये स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स विभाग सुरू झाला असून या द्वारे कथक नृत्य, भरतनाट्यम नृत्य , नृत्य योगा, नृत्य व कोरिओग्राफी हे कोर्स सुरू झाले असून या विषयात विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. डॉ.नंदकिशोर कपोते यांनी २००५ साली कथक नृत्यात पी.एच. डी(डॉक्टरेट) ही पदवी प्राप्त केली असुन कथकनृत्यात पी.एच. डी.प्राप्त करणारे डाॅ.कपोते हे महाराष्ट्रातील पहिले कथक नर्तक आहेत. डॉ.नंदकिशोर कपोते हे ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गुरूदेव रवीशंकर यांची श्री श्री युनिव्हर्सिटी कटक, श्री छत्रपती शिवाजीमहाराज युनिव्हर्सिटी पनवेल येथे नृत्य विषया साठी गाईड (मार्गदर्शक) म्हणून कार्यरत आहेत. आज भारतातील अनेक कथक कलाकार डाॅ.कपोते यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच. डी.करत आहेत. डाॅ.पं.नंदकिशोर कपोते हे दिल्ली दूरदर्शन, भारत सरकार चे ए ग्रेड चे कलाकार असुन डाॅ.कपोते यांना नृत्य क्षेत्रात ५० वर्षे केलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, पुणे महानगर पालिकेचा बालगंधर्व पुरस्कार, भारत सरकारची सिनीयर फेलोशिप असे अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच प्राध्यापक म्हणून भरतनाट्यम नर्तिका स्वाती दैठणकर व समन्वयक म्हणून नर्तिका निकिता मोघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading