fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

अंकिता आणि अनुराग यांनी विवाहानिमित्त कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर केला आनंद साजरा

पुणे : अंकिता भोसले व अनुराग पंडित यांचा विवाह नुकताच पार पडला परंतु परदेशात नोकरी करणाऱ्या दोघांनीही विवाहानिमित भारती विद्यापीठ येथील कॅन्सरग्रस्त मुलांना ब्लँकेट ,खाऊ व जीवनावश्यक वस्तू भेट देत त्यांच्यासोबत केक कापून आनंद साजरा केला . विविहानिमित असा सामजिक उपक्रम करून अंकिता आणि अनुराग या जोडप्याने समाजाला एक नवा आदर्श निर्माण केला आहे .
आपल्या विवाहानिमित्त अंकिता आणि अनुराग यांनी आपल्या पालकांना काहीतरी सामाजिक उपक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली .त्यावेळी नीलिमा भोसले व संजीव भोसले यांनी त्यांना या उपक्रमास प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले . भारती विद्यापिठ हॉस्पिटल येथील सुमारे 50 ते 60 कॅन्सर वर उपचार घेत असलेल्या मुलासोबत त्यांना विविध भेट वस्तू देऊन आपल्या विवाहाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या अंकिता आणि अनुराग या नवविवाहित दाम्पत्याचे कौतुक सर्वत्र होत आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading