ग्लोबल हेल्थ लिमिटेडच्या प्राथमिक सार्वजनिक ऑफरींग 03 नोव्हेंबर 2022 पासून खुल्या
मुंबई : ग्लोबल हेल्थ लिमिटेड (“कंपनी”), जी सध्या ‘मेदांता’ ब्रँड अंतर्गत पाच रुग्णालयांचे (गुरुग्राम, इंदूर, रांची, लखनऊ आणि पाटणा येथे) नेटवर्क चालवते आणि एक रुग्णालय (नोएडामध्ये) ज्याचे बांधकाम चालू आहे, 03 नोव्हेंबर 2022 रोजी आपले प्राथमिक सार्वजनिक ऑफरींग खुली करणार आहे.
ऑफरचे प्राइस बँड प्रत्येकी ₹ 2 दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी ₹ 319 ते ₹ 336 निश्चित करण्यात आले आहे. किमान 44 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतरच्या इक्विटी शेअर्ससाठी 44 पटीत बोली लावता येईल.
प्राथमिक सार्वजनिक ऑफरींगमध्ये ₹5,000.00 दशलक्ष पर्यंतचे नवीन इश्यू आणि विक्री करणार्या भागधारकांद्वारे 50,761,000 इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे ज्यात कार्लाइल ग्रुपशी संलग्न अनंत इन्व्हेस्टमेंट्सचे 50,661,000 इक्विटी समभाग आणि सुनील सचदेवा यांचे 100,000 इक्विटी समभाग (सुमन सचदेवा सह संयुक्तपणे) यांचा समावेश आहे.
ताज्या इश्यूंद्वारे मिळालेली रक्कम आपल्या दोन सहाय्यक कंपन्या जीएचपीपीएल आणि एमएचपीएल, यांमध्ये कर्ज किंवा इक्विटीच्या स्वरूपात अशा सहाय्यक कंपन्यांच्या पूर्ण किंवा आंशिक कर्जाच्या परतफेडीसाठी/प्रीपेमेंटसाठी, ₹3,750.00 दशलक्ष इतके, गुंतवणुकीसाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. निव्वळ इश्यूच्या रकमेतील शिल्लक रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल.
सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (विनियम) नियम, 1957 चा नियम 19(2)(बी), तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (भांडवल आणि प्रकटीकरण) विनियम, 2018 (“एस.ई.बी.आई. आय.सी.डी.आर विनियम”) च्या विनियम 31 अनुसार आणि एस.ई.बी.आय आय.सी.डी.आर विनियमांच्या विनियम 6(1) चे अनुपालन करून, ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, ज्यामध्ये 50% पेक्षा जास्त ऑफर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यु.आय.बी.”, आणि असा भाग, “क्यु.आय.बी. भाग”), प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध नसेल, कंपनी आणि गुंतवणूकदार विक्री भागधारक, बी.आर.एल.एम. शी सल्लामसलत करून, एस.ई.बी.आय आय.सी.डी.आर. नियम (“अँकर गुंतवणूकदार भाग”) अनुसार, क्यु.आय.बी भागाच्या 60% पर्यंत अँकर गुंतवणूकदारांना विवेकाधीन आधारावर वाटप करत नाहीत तोपर्यंत, ज्यातील एक तृतीयांश देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल, एस ई.बी.आई. आय.सी.डी.आर विनियमांस अनुसरून स्थानिक म्युच्युअल फंडांकडून अँकर गुंतवणूकदार वाटप किंमतीस किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीस वैध बोली प्राप्त झाल्यास. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी-सदस्यता झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, शिल्लक इक्विटी शेअर्स निव्वळ क्यु.आय.बी. भागामध्ये जोडले जातील.
