Friday, August 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

त्यामुळं हे सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याचं दिसतंय – आदित्य ठाकरे

पुणे:फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुरजारतला गेलाय. सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प बडोद्यात होणार आहे.
22 हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पावरून आता विरोधकांनी शिंदे सरकारला घेरलं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रक्लप महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. पण एवढा मोठा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यामुळं हे सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याचं दिसतंय.असा आरोप आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले,वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. परंतु, त्यांना हे जमलं नाही. हे सरकार स्वत:साठी काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाच्या काळात देखील साडे सहाशे कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. परंतु, आता दोन्ही सरकारं त्यांचीच असताना महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर जात आहेत. दिल्लीला अनेकवेळा आपल्या स्वत:साठी जातात त्यावेळी याबाबत बोललं पाहिजे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading