Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

शास्त्रज्ञा सोबत पहा सूर्यग्रहण विद्यापीठाच्या मैदानावर

पुणे:यंदाच्या दिवाळीत खंडग्रास सूर्यग्रहणामुळे सर्वांच्याच आनंदात अधिक भर पडणार आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या वतीने सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आले आहे.
ऊघा गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. यासाठी सर्वच विज्ञानप्रेमी नागरिक सरसावले असून, दशकातून येणाऱ्या या अभूतपूर्व खगोलीय घटनेसाठी विज्ञान प्रसार संस्थांच्या वतीने विशेष आयोजन करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या क्रिडा संकुलापाशी अर्थात आयुकाच्या शेजारच्या मैदानावर शास्रज्ञांच्या वतीने संध्याकाळी चार वाजेनंतर विशेष आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सूर्यग्रहण म्हणजे काय, ते कसे पाहावे, त्याची वैशिष्ट्ये आणि शास्रज्ञांसोबतच्या खुल्या गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे. आकाश जर निरभ्र असल्यास दुर्बिणीच्या साहाय्यानेही नागरिकांना सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यावर सूर्यग्रहण होते. पुण्यातून पाहताना चंद्र सूर्याचा जवळपास २३ टक्के भाग व्यापणार आहे. देशातील वेगवेगळ्या भागातून ही टक्केवारी वेगळी आहे. नागरिकांना घरबसल्या सूर्यग्रहणाचा आनंद घेता यावा, तसेच देशातील इतर ठिकाणातील सूर्यग्रहणही पाहता यावे, यासाठी तेथील ग्रहणाचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांवर करण्यात येणार आहे. हिंगोली, गुहागर, रत्नागिरी, लोणार आणि पुण्यातील थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.

प्रक्षेपण पाहण्यासाठी : https://www.youtube.com/iucaascipop/live

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading