Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

रेल्वे स्टेशन वरील गर्दी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली वाढ

पुणे : दिवाळीनिमित्त राज्यभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली आहे. याच गर्दीमुळे पुण्यातील रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती. मात्र, साजन बलदेवन याचा मृत्यू चेंगराचेंगरीत मृत्यु झाला नसून, दम्याच्या आजारामुळे सदर प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला. साजन बलदेवन हा काल पुणे दानापूर एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बिहारला जाणार होता.
पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरांमध्ये मोठी वाढ केली आहे.
विशेष म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मचे तिकीट हे रू. 10/- वरून वाढवून रु. 30/- दराने देण्यात येईल. हा कायमस्वरुपी निर्णय नाही. सध्या केवळ दिनांक 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या कालावधीत हे बदल असतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं असलं तरी आता रेल्वे प्रशासनाला प्लॅटफॉर्मवर होणारी दर्दी टाळायची आहे. त्यामुळे आता पुणे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मचे तिकीट हे 30 रुपये दराने केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading