संभाजी ब्रिगेडचा पुण्यात भव्य मेळावा संपन्न
पुणे : संभाजी ब्रिगेडचा पुण्यात भव्य मेळावा पार पडला, मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकन्यात आले,अध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात गाव तेथे शाखा व घराघरात संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता ही मोहीम संभाजी ब्रिगेड च्या वतीने हातात घेणार आहोत असा निर्धार कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला,
आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेड चे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आणून संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचा भगवा झेंडा आम्ही फडकऊ असा विश्वास संभाजी ब्रिगेड चे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी व्यक्त केला,
मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन आणि संभाजी ब्रिगेड चा आतापरेंतचा इतिहास व प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपल्या आपल्या कामाची जाणीव करून देणारे व संघटन वाढवण्यासाठी काय करावं लागेल त्या सुचना देऊन आपले मनोगत व्यक्त केले,
महानगरध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिंदे गट व भाजप सरकारचा खरपूस समाचार घेऊन, येणाऱ्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला,
आज घोले रोड येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहर जिल्हा मेळाव्याला जिल्हा व शहरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते, कामगार नेते नावनाथ भाऊ जाधव व मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निलेश शेठ कांबळे यांच्या सहित अनेक जणांनी संभाजी ब्रिगेड मध्ये पक्ष प्रवेश केला तसेच अनेकांची संभाजी ब्रिगेड च्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भाऊ गायकवाड, सनी थोपटे, डॉ कुमार गायकवाड, चैतन्य कुवर यांच्या सहित अनेक जणांना उत्कृष्ट काम केल्या मुळे सन्मानित करण्यात आले, प्रास्ताविक संदीप कारेकर यांनी केले,
यावेळी, जिल्हा सचिव निलेश ढगे, तेजस्विनी पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, उषा जरांडे, रेखा कामठे, उज्वला कामठे, जोतिबा नरवडे, सिद्धार्थ कोंढाळकर, साजिद सय्यद, कुमार गायकवाड, मावळ लोकसभा अध्यक्ष दिनकर केदारी, हनुमंत गुरव, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, उमेश मांढरे, अक्षय गायकवाड, खेड तालुकाध्यक्ष देविदास कोरडे, सनी थोपटे, विजय कदम, जयदीप रणदिवे, महादेव मातेरे, अतुल येवले, अनिल बोटे,कुमार पवार, शिवाजी खुटवड, अंकुश हाके, आदम तांबोळी, सोनू शेलार, विवेक कावरे, विठ्ठल सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी आदि उपस्थित होते,
