Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Rain Updates – एवढा मुसळधार पाऊस नेमका कशामुळे झाला? हवामान विभागाने दिले उत्तर

पुणे : सकाळी उन्हाचा चटका वाढला. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मोठ्या उंचीचे ढग शहर आणि परिसरात आले. त्यातून रात्री मुसळधार पाऊस पडला. विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने रात्री शहराला पुन्हा अक्षरशः बुडविले. पुणे शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले आहे.पावसाचा जोर इतका भयंकर होता की, सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. रात्री साडेनऊ ते साडेदहा या दोन तासांमध्ये ८१ मिलिमीटर पाऊस शिवाजीनगरमध्ये नोंदला गेला.

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या माणिक नाला, नागझरी, आंबिल ओढा, दुथडी भरून वाहत होते. या नाल्याच्या कडेने राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पाऊस नेमका कशामुळे एवढा जोरात पडला याचे उत्तर हवामान विभागाने दिले आहे. सकाळी उन्हाचा चटका वाढला. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मोठ्या उंचीचे ढग शहर आणि परिसरात आले. त्यातून रात्री मुसळधार पाऊस पडला. असे हवामान विभागाने उत्तर सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading