Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

 पुण्यातील प्रख्यात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ निलेश बलकवडेंचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

महिलांच्या आरोग्यासाठी उल्लेखनीय कार्यबद्दल वी फॉर स्त्री  पुरस्कार प्रदान  

पुणे : प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने मुंबईच्या राजभवनावर नुकताच पार पडलेल्या एका शानदार समारंभात राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथील प्रख्यात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ निलेश उन्मेष बलकवडे यांचा स्त्री व पुरुष वंध्यत्वामध्ये आणि महिलांच्या आरोग्यासाठी उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्र राज्य प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे  वी फॉर स्त्री  पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

महिलांच्या आरोग्याच्या क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक प्रसूतीतज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते  राजभवनावर सन्मान करण्यात आला . या प्रसंगी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षा डॉ नंदिता पालशेतकर, नवनियुक्त अध्यक्ष डॉ राजेंद्रसिह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच असंख्य तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.  राजपालांच्या हस्ते ३६ डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. त्यात डॉ निलेश उन्मेष बलकवडे यांचा स्त्री व पुरुष वंध्यत्वामध्ये आणि महिलांच्या आरोग्यसाठी उल्लेखनीय कार्य आहे त्यांनी अनुभव आणि अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान यांचा अचूक मेळ साधत अनेक जोडपांच्या आयुष्यात पालकत्वाचे सुख दिले आहे. मला आई व्हायचय!! सारख्या अनके मोहिमा राबवत रूग्णांना मोफत सल्ला रेजिस्ट्रेशन देत आहेत तसेच वंध्यत्वानी नैराशेचा सामना करणाऱ्या जोडप्यांना  मोफत समुपदेशन करत आहेत.

डॉ.निलेश बलकवडे हे ओऍसिस फर्टिलिटी, ( वाकड व खराडी ) येथे क्लिनिकल हेड या पदावर कार्यरत असून ओऍसिस फर्टिलिटी च्या माध्यमातून वंद्यत्वाच्या जनजागृती साठी अनेक शिबिरे आयोजित करून वंध्यत्वा चे समज गैरसमज आणि वंध्यत्वाच्या उपचार पद्धती याविषयी मार्गदर्शन करत आहेत आणि वंध्यत्वावरील आयव्हीएफ सारखे आत्याधुनिक प्रगत उपचार माफक दरात  करत आहेत

ओऍसिस फर्टिलिटीसेंटरचे  क्लिनिकल हेड  डॉ निलेश बलकवडे म्हणाले की मी संशोधन, नैतिकता आणि ममत्व यांच्याआधारे उत्कृष्ट उपचार आणि काळजी पुरविण्यास वचनबद्ध आहे. एएमओजीएस संघटनेमध्ये काम करायला मिळाल्याबद्दल अध्यक्षा डॉ नंदिता पालशेतकर, नवनियुक्त अध्यक्ष डॉ राजेंद्रसिह परदेशी यांचे आभार मानतो .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading