Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

कुख्यात गुंड गजा मारणे याला न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

पुणे:गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण केले होते. त्याप्रकरणी
कुख्यात गुंड गजा मारणे त्यांच्या कुटुंबीयांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मारणेसह दोघांना अटक केली होती.पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मारणेला साताऱ्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतले होते. कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे आणि मयूर जगदीश जगदाळे होळकरनगर, आंबेगाव पठार अशी अटक गुंडांची नावे आहेत. गजा मारणेसह सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रेय घोलप हेमंत ऊर्फ बालाजी पाटील , फिरोज महंमद शेख सराईत गुन्हेगार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर अजय बबन गोळे , मयूर राजेंद्र निवंगुणे आणि प्रसाद बापू खंडाळे यांना या गुन्ह्यात यापूर्वी अटक केली आहे. याप्रकरणी मारणे आणि जगदाळे यांनी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली वाहने कुठे ठेवली आहेत याचा तपास करण्यासाठी तसेच साक्षीदाराचा चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी दोघांना मोक्का कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने दोघांना मोक्का कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading