Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने अखेर माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजप उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

त्यानंतर आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading