fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांनो उज्ज्वल भविष्यासाठी खुणावतोय जपान – रेन्या किकुची

पिंपरी : जपानने संशोधन, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, रोबोटीक सायन्स अशा क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी जपान मध्ये उज्ज्वल भविष्याची संधी असून त्यासाठी जपानी सरकार आणि तेथील संस्था आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे, अशी भावना जपान मधील जपान एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मध्ये पीसीईटी – इंडो – जपान बिझनेस कौन्सिल, जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने शिक्षण – उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी ‘नो – जपान’ (Know Japan) या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पदमाताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या परिषदेचा समारोप  झाला. समारोप प्रसंगी किकुची यांनी जपान मधील शिक्षण, संशोधन, उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रांतील संधी विषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी टोकियो विद्यापीठाचे प्रतिनिधी सासाकी सान, कझुको बॅरेसे, आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. अनुराधा ठाकरे, डॉ. रोशनी राऊत, ओंकार बाली आदी उपस्थित होते.

किकुची म्हणाले, भारताने गेल्या काही वर्षांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. ‘इंडो – जपान’ सहकार्यांतर्गत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाची कामे केली आत आहेत. विद्यार्थ्यांनी जपानला भेट द्यावी. तुम्हाला चांगला अनुभव निश्चितच मिळेल. त्यासाठी मी आग्रहाचे निमंत्रण देत आहे, असे किकुची म्हणाले.
सासाकी सान यांनी जपानी भाषेचा बाऊ न करता निसंकोचपणे जपानमध्ये या. तुम्हाला भाषेची फारशी अडचण भासणार नाही. सरावाने जपानी भाषा बोलता येईल असे सांगितले.
सिद्धार्थ देशमुख म्हणाले की, दूरदृष्टी ठेवून, विचार करून जपानी लोक मैत्री करतात आणि मैत्री दीर्घकाळ निभावत. हा अनुभव भारत सत्तर वर्षांपासून घेत आहे. जपानमध्ये अंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था विद्यापीठे आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती करण्यावर लक्ष केंद्रीत करून ‘आयजेबीसी’ वाटचाल करत आहे.
डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी पीसीसीओई आणि आयजेबीसीच्या सहकार्याने पुढील वर्षी विविध क्षेत्रांतील कार्यानुभवासाठी विद्यार्थ्यांना जपानला जाण्याची संधी दिली जाईल. जपानी भाषा शिकण्यासाठी खास वर्ग सुरू करण्यात येईल. यासाठी कायमस्वरूपी माहिती व मार्गदर्शन केंद्र पीसीसीओई मध्ये सुरू करण्यात आले आहे असे सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. अनुराधा ठाकरे यांनी दोन दिवसांत झालेल्या सत्रांचा आढावा घेतला. विविध विषयांवर एकुण २१ सत्रांमध्ये सुमारे औद्योगिक संस्थांचे शंभरहून अधिक प्रतिनिधी आणि अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. दीपक करंदीकर, यासुकाता, सिद्धार्थ देशमुख, प्राची कुलकर्णी, अतुल पारेख, ए. हैदर, अमृता मुसळे, गीता देशमुख, मदुरा मांडके, सुधीर जयस्वाल आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading