Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पाषाण सुस रोडवर शिवशाही चा भीषण अपघात सात ते आठ गाड्यांचे मोठे नुकसान


पुणे:पुण्यात सातत्याने मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. पाऊस वाढल्याने देखील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अपघाताचे प्रमाण सुद्धा पुण्यात वाढले आहे. आज पाषाण-सुस परिसरात भीषण अपघात झाला असून यामध्ये सात ते आठ गाड्यांचे नुकसान झालं आहे.पाषाण सुस रोडवर एका मागोमाग एक गाड्या धडकल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ७ ते ८ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात शिवशाही बससह अनेक चार चाकी गाड्यांचा समावेश आहे.
बोरिवली ते सातारा शिवशाही बसचा गाडीचा अचानक ब्रेक फेल झाला. यामुळे एसटी ने समोर असलेल्या गाड्यांना धडक दिली. या धडकेत ४ ते ५ जण जखमी असून त्यांना नाजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. चार चाकी गाड्यांसह एका मोटार बाईकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading