Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी वाई येथून ताब्यात घेतले


पुणे:कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून साताऱ्यातील वाई पुणे पोलिसांनी जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्महाऊसवर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले आहे.
गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण केले होते. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यात या व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर तपासात प्रकाश बांदिवडेकर यानेही धमकाविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने इंदूरमधून त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलीस गजानन मारणेला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading