fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सरकार अतिशय उत्तम चालले आहे -चंद्रकांत पाटील


पुणे : राज्यातील नवीन सरकार स्थापन झाले शिंदे व फडणवीस सरकार हे पाच वर्षे टिकणार नाही. असे विरोधी पक्षनेते अजित पवार व जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यावर सरकार अतिशय उत्तम चालले आहे. अति प्रतिक्रिया तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
शिंदे व फडणीस सरकारमधील काही आमदार महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चा आहेतकोणीही आमदार नाराज नाही .आणि कोणी नाराज असेल तर अशा आमदारांची समजुत काढण्याची आमची तयारी आहे. असे चंद्रकांत पाटील हे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळेबाज शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी रद्द करण्याकरिता पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी सुनवाणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यावरटी ई टी च्या बाबतीत संबंधित खाते योग्य ती कारवाई करेल. यामधे कठोर कारवाई व्हायला हवी असे मला वाटते. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
काल पुण्यात दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.एखाद्या नागरिकाच्या तक्रारी पाठीमागची भावना समजून घेतली पाहिजे. पण पार्श्वभूमी समजुन घेतली पाहिजे.काल हंगामातील सर्वात जास्त पाऊस पडला. तज्ञांनी सांगितले की पाऊस गेला. पण पाऊस पडतोच आहे. दिवसभर पाऊस पडला तर वाहून जाईल. पण धपाधप पाऊस पडला. वाहून जाण्याची शक्यता नसल्याने तो रस्त्यावरच येणार. पण या हंगामात ते दोन तीनवेळा घडलय .त्यामुळे याची चौकशी करु. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतीचे फार नुकसान झाले आहे.शेतीच्या नुकसानीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत बोललो आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीकडून सरकार अल्पमतात आल्यावर अनेक कामे मंजुर करण्यात आली. ती अवैध आहेत. म्हणून त्यावर आम्ही स्थगिती आणाली. ही स्थगिती टप्प्या टप्प्याने उठवली जाईल. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यात सेक्सटॉर्शन चे एकाच आठवड्यात दोन बळी गेले आहेत.सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून होणारी फसवणूक ही गंभीर आहे. पालकमंत्री म्हणून आढावा घेताना पोलीस खात्याच्या बैठकीत मी हा विषय घेणार आहे. मी याबाबत चिंतित आहे. याबाबत सायबर पोलीसांसोबत चर्चा करु.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading