fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या कॉलेज हॉस्टेलमध्ये एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न राज्यात खळबळ

पुणे: राज्यात बलात्काराच्या घटना या वाढत आहे तशातच राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेज मधील फार्मसीच्या विभागातील लेडीज हॉस्टेलमध्ये मुलींच्या टॉयलेट मध्ये घुसून एका कॉलेज तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका अज्ञात वर गुन्हा दाखल करण्यात आला असून वानवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सावंत यांच्या पुण्यातील हांडेवाडी रोडवर असलेल्या फार्मसी कॉलेजमधील गर्ल टॉयलेट मध्ये एका अनोळखी व्यक्तीने घुसून युवतीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता पुणे पोलीस पुढचा तपास करत आहे.
या प्रकारामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यावर काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे विरोधक या प्रकरणावर शिंदे सरकारला कसे धारेवर धरतात. हे सुद्धा थोड्या दिवसात आता समजेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading