डॉ. बत्रा’ज पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सचे वितरण
मुंबई : कठीण परिस्थितींचा सामना करून समाजात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने डॉ. बत्रा’जद्वारे पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात मृदूल घोष, झैनिका जगासिया, डॉ. जितेंद्र अग्रवाल, डॉ. फातिमा आसला, अमीर सिद्दिकी यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टाटा थिएटर, एनसीपीए, मुंबई येथे बजाज ऑटोच्या सहयोगाने करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याचे हे चौदावे वर्ष होते.
देशभरातील शेकडो अर्जांमधून विजेत्यांची निवड करण्याची मोठी जबाबदारी मान्यवर परीक्षक मंडळाने पार पाडली. त्यात राजीव बजाज- व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो, डॉ. मुकेश बत्रा, पद्मश्री आणि डॉ.बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक, मनेका संजय गांधी, विवेक ओबेरॉय आणि डॉ. आर. बाल्की यांचा समावेश होता.
डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्हणाले की, “पॉझिटिव्ह हेल्थ हिरोज आपल्याला सक्षम शरीर असलेल्यांना आयुष्यात आणखी कामगिरी करून समाजात योगदान देण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे आणि एक काळजी घेणारा ब्रँड म्हणून आम्हाला त्यांच्या अदभुत कथा जगासमोर आणताना खूप गौरव वाटतो आहे. आमच्या आधीच्या विजेत्यांनी उत्तमोत्तम कामगिरी करून भारतात इतरही अनेक गौरव मिळवले आणि आम्हाला आशा आहे की, त्यांची मेहनत आणि दृढनिश्चय त्यांना नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी मदत करेल. आम्ही श्री. राजीव बजाज यांचे या खऱ्या आयुष्यातील हिरोंची ओळख पटवण्याच्या आमच्या प्रयत्नात त्यांच्या सहाय्यासाठी आभारी आहोत.”
या पुरस्कार सोहळ्यात आघाडीचे उद्योजक, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचा सामील झाले होते. अंध व्यक्तींच्या ऑर्केस्ट्राने गायलेल्या स्वरांगी या गाण्याने आणि मिरॅकल ऑन व्हील्स या डान्स ग्रुपने व्हीलचेअरवर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात अनेक मान्यवर सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती दर्शवली यात सिमी गरेवाल, मधु शाह, भरत दाबोलकर, सिद्धार्थ काक, गौरव शर्मा, रूपाली सुरी, सोनल जिंदाल, ग्वेन अथाईड, सिमरन आहुजा, सोमा घोष, मिकी मेहता आणि दिलीप पिरामल एसडी सहभागी झाले होते.
