Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

बीपीसीएलने दक्षिण भारतात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा दुसरा टप्पा केला सुरू

बंगळुरू : ‘महारत्न’ आणि एक फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)ने आज भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात बंगळुरू-चेन्नई आणि  बेंगळुरू-म्हैसूर-कूर्ग महामार्ग या दोन कॉरिडॉरवर ईव्ही फास्ट-चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची घोषणा  बंगळुरू येथील एका कार्यक्रमात केली.

जलद चार्जर CCS-2 प्रोटोकॉलचे पालन करतात आणि मार्गांच्या दोन्ही बाजूंना अंदाजे १०० किमी अंतरावर त्याच्या नऊ इंधन स्टेशनवर व्यवस्थितपणे उभारण्यात आले आहेत.

देशातील प्रमुख शहरे आणि आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर सर्व प्रमुख पंपांवर ठराविक अंतराने CCS-2 EV चार्जिंग स्टेशन्स पुरवण्याची बीपीसीएलची योजना आहे. चेन्नई-त्रिची मदुराई महामार्ग हा पहिल्या टप्प्याचा भाग होता.

25 KW फास्ट चार्जरच्या जोडणीमुळे ग्राहकांना ३० मिनिटांत त्यांची ईव्ही चार्ज करणे शक्य होईल आणि बीपीसीएलच्या HelloBPCL या युजर फ्रेंडली पेमेंट मोबाईल अॅप्लिकेशनच्या सुविधेसह १२५  किमी प्रवासाचा आनंद घेता येईल. फास्ट चार्जर कोणत्याही मॅन्युअल सहाय्याशिवाय स्वयंचलित पद्धतीने काम करू शकते. तथापि, आवश्यकता असल्यास सपोर्ट स्टाफची मदत उपलब्ध असेल.

ईव्ही फास्ट चार्जिंग कॉरिडॉर सादरीकरणाच्या वेळी बोलताना बीपीसीएलचे कार्यकारी संचालक इन-चार्ज (रिटेल) पी. एस. रवी म्हणाले, “भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेची वाढ गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय आहे आणि बेंगळुरू-चेन्नई महामार्ग आणि बेंगळुरू-म्हैसूर कूर्ग महामार्गावर आमचे ईव्ही फास्ट-चार्जिंग कॉरिडॉर सुरू करणे हे स्वच्छ पर्यावरणाच्या पर्यायांकडे जाण्याच्या भारताच्या ईव्ही  स्वप्नाशी सुसंगत आहे. “उत्कृष्ट” सुविधा आणि अनुभव प्रदान करण्यात आमची गुणवत्ता आमच्या ईव्ही ग्राहकांना दोन नवीन कॉरिडॉरमध्ये सेवा देईल आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या या रोमांचक प्रवासात प्यूअर फॉर शुअर असा निश्चित अनुभव देईल.”

या सादरीकरणाच्या घोषणेसह बीपीसीएलचे उद्दिष्ट नवीन व्यवसाय विभागांवर लक्ष द्यायला चालना देण्याकडे असून विविध इंधन पर्याय पुरविताना ७,००० पारंपरिक रिटेल आऊटलेट्सचे ऊर्जा स्थानकांत परिवर्तन करण्याचे बीपीसीएलचे ध्येय आहे. त्यामध्ये मध्यम ते दीर्घ काळासाठी ईव्ही चार्जिंग सुविधाही समाविष्ट आहे.

भारत पेट्रोलियम इंधन केंद्रे ग्राहकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहे, रोख पैसे काढणे, चार्जिंग करताना सुरक्षित पार्किंग, मोफत डिजिटल एअर सुविधा, 24 तास कामकाज आणि अशा बऱ्याच गोष्टी पुरवितात. निवडक इंधन केंद्रे नायट्रोजन भरण्याची सुविधा देखील देतात. भारत पेट्रोलियमची महामार्गावरील अनेक  इंधन स्थानके मॅकडोनाल्ड्स, A2B, क्यूब स्टॉप, कॅफे कॉफी डे आणि इतर स्थानिक आउटलेट्स यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्ससोबतच्या धोरणात्मक सहयोगाद्वारे आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थ पुरविण्याची सुविधा देखील देतात. भारत पेट्रोलियमने आपल्या ग्राहकांच्या अधिक सोयीसाठी महामार्गावरील प्रमुख इंधन केंद्रांवर आपल्या इन अँड आउट सुविधा स्टोअरची साखळी सुरू करण्याची योजना आखली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading