Friday, May 29, 2026
BusinessLatest News

बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्सने बहुभाषिक वेबसाईट सुरु केली; सहा भारतीय क्षेत्रीय भाषांचा समावेश

पुणे: भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्सने आपली बहुभाषिक अधिकृत वेबसाईट सुरु केली आहेज्यावर सहा भारतीय क्षेत्रीय भाषांमध्ये कन्टेन्ट उपलब्ध आहे. जीवन विमा सेवासुविधा आणि उत्पादनांचा लाभ सर्वांना अतिशय सहजपणे घेता यावा या बजाज आलियान्झच्या व्हिजनला अनुसरूनदेशभरात विमा सेवेबाबत जागरूकता वाढावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जीवन विम्याचे लाभ आणि कंपनीची उत्पादने व सेवांची माहिती आता ग्राहकांना हिंदीमराठीतामिळकन्नडबंगाली व मल्याळम या सहा भाषांमध्ये वाचता व समजून घेता येणार आहे.

बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर  चंद्रमोहन मेहरा यांनी यावेळी सांगितले, “पुढील काही वर्षांमध्ये नव्याने इंटरनेटचा वापर करत असलेल्या दर दहांपैकी नऊ व्यक्ती या इंग्रजी न जाणणाऱ्या असतील. विमा खरेदी करण्याच्या या प्रक्रियेच्या आधी व नंतर विम्याचे सुलभीकरण करण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांच्या संरक्षण व दीर्घकालीन गुंतवणूक गरजा त्यांना सोयीच्या अशा भाषेत पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय भाषांचा उपयोग करणे खूप महत्त्वाचे आहे.”

विम्याशी संबंधित विविध संकल्पना आणि माहिती लोकांना अतिशय सहजपणे समजावी यासाठी बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्स विविध माहिती उपक्रम राबवत आहे. याआधी ऎय्यो श्रद्धा या लोकप्रिय इन्फ्ल्यूएंसरसोबत सहयोगातून कंपनीने “लाईफ गोल मंत्राज्” हा विषय घेऊन कंपनीने व्हिडीओची एक सीरिज देखील आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सादर केली आहे.

www.bajajallianzlife.com वर जाऊन युजर्स क्षेत्रीय वेबसाईटचा लाभ घेऊ शकतात.  वेबसाईटच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनचा वापर करून युजर्स त्यांना हवी असलेली भाषा निवडू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading