अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके, मुरजी पटेल यांचे अर्ज दाखल
मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जागेसाठी आतापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. महाविकास आघाडीतर्फे ऋतुजा लटके, भाजपकडून मुरजी पटेल तर दोन अपक्ष आणि क्रांतिकारी जय हिंद सेनेच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंच आहे. मतदान ३ नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या ऋतुजा लटके, भाजपकडून मुरजी पटेल, राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, मुंबई महापालिकेच्या सेवेच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला होता. शेवटी तो न्यायालयात गेल्याने भाजप आणि शिंदे गटाने नव्या चाली रचल्या होत्या.
ऋतुजा यांचा अर्ज न आल्यास या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी भाजप, शिंदे गट प्रयत्नशील होता. भाजपने उमेदवारी जाहीर केलेले पटेल यांनीही दुपारी १ वाजताच्या सुमारास अर्ज भरला आहे. होते. त्यासाठी पक्ष आणि पटेल समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. न्यायालयाचा निकाल शिवसेना आणि लटके यांच्याविरोधात गेला असता; तर ही जागा शिंदे गटाला सोडण्याची तयारी भाजपची असल्याचे सांगण्यात येत आहे.
