Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कोणी प्रेम करो ना करो आम्ही मात्र प्रेम करतच राहणार..; वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत

पुणे : मनसेचे वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आहे. आपल्या हटके स्टाईल कामाने ते सोशल मीडियावर हिरो ठरले आहेत. आता परत ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वसंत मोरेंचा बालेकिल्ला म्हणजे कात्रज परिसर याच कात्रज चौकात i Love katraj असा डिजिटल बोर्ड आहे. त्यात i च्या पुढे बदाम आणि कात्रज असे इंग्रजी मध्ये लिहिलेले आहे, यातील कात्रज या शब्दातील ‘kat’ या शब्दावर लाईट नसल्याने तो झाकला गेलाय. अन् फक्त i Love Raj असं केवळ दिसतंय, आणि वसंत मोरेंच्या अचूक नजरेनं नेमकं हेच हेरल.

त्यानंतर “कोणी प्रेम करो ना करो आम्ही मात्र प्रेम करतच राहणार…” अशा शब्दांत मोरे यांनी फेसाबूकवर पोस्ट लिहिली असून ती तूफान व्हायरल झाली आहे. त्यात मोरे यांनी लिहिले आहे की, परवा रात्री ज्या तरुणीला मदत केली तिला गाडीवर बसलेली पाहिली आणि अचानक कात्रजमधील  I❤️ KATRAJ चौकातील बोर्डवर लक्ष गेले.  तर तिकडे ही वाक्य राहिली होती… म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी.. . अशी पोस्ट वसंत मोरे यांनी लिहिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02BMU4dw4dMzxqzKTBTSZEokq9w94JcMhUSJagrrz5jhVbxn6rzUAyNS2rf4urcpe4l&id=100044231363898&sfnsn=wiwspwa

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading