Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

स्पर्धा परीक्षा समितीच्या विद्यार्थ्यांची बोलताना गिरीश महाजन भडकले ऑडिओ क्लिप वायरल


पुणे:जिल्हा परिषद भरती क परीक्षेबाबतची सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमधील आवाज मंत्री गिरीश महाजन यांचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.शिवाय या क्लिपमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांशी अर्वाच्च भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. ती व्यक्ती महाजन असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदस्पर्धा परीक्षा समितीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक विद्यार्थी झेडपीची फाईल तुमच्याकडे आली असून ती पाठवा ना साहेब, मुलं खूप डिप्रेशनमध्ये आहेत.’ त्यावरती समोरील व्यक्ती जी महाजन असल्याचा आरोप केला जात आहे.
गिरीश महाजन म्हणतात, तुम्हाला काही कामं नाहीत का रे, दिवसरातून ५०० फोन लावता, मी काही करत नाही ती रद्द झाली, असं म्हणतायत. त्यावर समोरचा मुलगा ‘अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, असं म्हणतोय त्यावर पुन्हा समोरुन ‘रद्द केली, ती ठेव फोन, असं बोलणारी व्यक्ती ही मंत्री गिरीष महाजन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, २०१९ च्या जिल्हा परिषद भरतीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे विद्यार्थ्यासोबत संभाषण, जर हा आवाज गिरीष महाजनांचा असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदस्पर्धा परीक्षा समन्वय समिती तर्फे त्यांचा जाहीर निषेध. चार वर्षांपासून भरतीची मागण्या करणाऱ्या बेरोजगार तरूनासोबत या प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही.
सत्ताधाऱ्यांना विनंतीची भाषा समजत नसेल तर येत्या ५-७ दिवसात भव्य मोर्चा आणि राज्यव्यापी आंदोलनाची चाचपणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मार्फत केली जात आहे तसेच येत्या सोमवारी ZP भरतीसाठी ट्विटर वॉर आयोजित केला गेला आहे त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदस्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading