fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

विक्रमकुमार आता प्रशासकीय कारकिर्दीत तर फक्त २ व्यक्तींसाठीच महापालिका आयुक्तपदी काम करत आहेत – उज्वल केसकर

पुणे : सहली आणि पार्ट्या, कॉन्फरन्स ज्यांनी ‘ठराविक जी हुजूर ‘ लोकांसाठीच आपल्या कारकिर्दीत आयोजित केल्या ,ते विक्रमकुमार आता प्रशासकीय कारकिर्दीत तर फक्त २ व्यक्तींसाठीच महापालिका आयुक्तपदी काम करत असल्याचा आरोप महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी केला आहे. संदर्भात त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्या नावे पाठविलेल्या अनावृत्त पत्रात असे म्हटले आहे.

विक्रम कुमारजी आपण आपण शैक्षणिक दृष्ट्या वास्तु विशारद म्हणजे आर्किटेक्ट आहात.महानगरपालिकेने 2013 साली प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात जवळपास 797 किलोमीटरच्या डीपी रस्त्यांची नोंदच घेतली नाही. ही वस्तुस्थिती आम्ही विहित मुदतीत हरकती सूचनेद्वारे नोंदवली होती.तीआपली चूक लपवण्यासाठी प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.

याबाबत सर्व कागदपत्र आपल्या कार्यालयात उपलब्ध आहेत.काहीतरी केले हे दाखवायचे आणि व्यावसायिकांचा फायदा करून द्यायचा हे जे नव्हे नवतंत्र महानगरपालिकेने अवलंबले आहे त्याचा हा भाग आहे असे आम्हाला वाटते. त्याचे अधिकारी शहर अभियंता, विकास योजनेतील अधिकारी हे सक्षम असून हे सर्व आठ दिवसाच्या आत मिसिंग लींक तुम्ही ज्या म्हणता त्या शोधू शकतात.दिवाळीनंतर आम्ही हे काम तुम्हाला मोफत करून देऊ.कुठल्याही सल्लागाराची कुणाच्याही सांगण्यावरून नेमणूक करू नका.अन्यथा मे हायकोर्टात जावे लागले.साहेब तुम्ही बदली करून घ्यावी ही विनंती,संस्थेच्या हिताचे काम न करता,बदली होऊ नये म्हणून फक्त 2 व्यक्ती साठी काम करीत आहत असे अधिकारी सांगतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading