fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

भारतीय व्यावसायिकांबरोबर तुर्की कंपन्या भागीदारी करणार

पुणे :  पुण्यातील क्रिसेंडो वर्ल्डवाईड या कंपनीने भारतीय व्यावसायिकांसाठी तुर्की कंपन्यांबरोबर भागीदारीची संधी निर्माण केली आहे. तुर्की देशातील निर्यातीची एकमेव महत्वाची संघटना टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली (TİM)च्या साथीने ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत “ट्रेड मिशन टू इंडीया” या व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील लोअर परेल येथील हॉटेल सेंट रेजिस येथे ही परिषद होणार आहे.

या व्यापारी परिषदेमध्ये फर्निचर, मार्बल, इंटिरियर डेकोरेटर्स, नर्सरी, सेंद्रिय उत्पादने आणि तुर्कीच्या मांस आणि जतन केलेले अन्न आणि बांधकाम कंपन्यांना भारता विस्तार करण्यासाठी उत्सुक आहेत. या कार्यक्रमाद्वारे भारतीय खरेदीदार, आयातदार आणि वितरकांसाठी तुर्की कंपन्यांबरोबर व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.
टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली (TIM) तर्फे क्रिसेंडो वर्ल्डवाईड कंपनी प्रतिनिधीत्व करणार आहे. तुर्की कंपन्यांच्या व्यावसायिक प्रतिनिधींना त्यांचे उत्पादन भारतीय बाजारपेठेत विस्ताराराठी तसेच भारतीय खरेदीदार/आयातदार/वितरक यांच्याशी जोडून यशस्वी व्यवसाय करार क्रिसेंडोद्वारे करण्यात येणार आहे.
ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेटिक्स, खाणकाम, फर्निचर उत्पादन, कापड, दागिने, एफएमसीजी, कृषी, रसायने आणि पशुखाद्य इत्यादी क्षेत्रांवर “तुर्की ट्रेड मिशन टू इंडिया” या कार्यक्रमात भर देण्यात येणार आहे.
गेल्या १५ वर्षांतील भारत-तुर्की द्विपक्षीय व्यापार यंदाच्या वर्षी US$ १०.७० अब्ज पार गेला आहे. टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली (TİM) ही तुर्की देशातील निर्यातीची एकमेव महत्वाची संघटना आहे. २७ क्षेत्रांसह ६१ निर्यातदार संघटना, १००,००० हून अधिक निर्यातदारांचे हि संघटना प्रतिनिधित्व करते. तुर्कीच्या परकीय व्यापाराची दिशा ठरविण्याबरोबरच निर्यात धोरणे, बाजारपेठ विस्तृत करते आणि जागतिक स्तरावर निर्यातदारांच्या स्पर्धेला समर्थन देण्याची कामे टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली करते.
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तारासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि व्यापाराच्या संधी वाढवण्यासाठी भारत आणि तुर्की केंद्र सुरू केल्यामुळे, क्रिसेंडो वर्ल्डवाईड जगभरातील विविध राष्ट्रांना व्यवसायाच्या विस्तारासाठी मजबूत आणि धोरणात्मक भागीदारीसाठी सर्वांगीण आणि भविष्यवादी दृष्टिकोनाने एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading