Shivsena : … ही लोकशाहीची कुचेष्टा – काँग्रेस राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : प्रादेशिक पक्ष संपविण्याचे सुतोवाच केंद्रातील सत्ताधिश भाजप खरे ठरवत असल्याचा अनुभव मविआ सरकार पाडण्या पासुनच राज्यातील जनता घेत आहे..! ‘राज्यपाल ते संविधानीक संस्थाचा’ गैरवापर करत असल्याच्या आरोपांना सतत पृष्टी मिळणाऱ्या घटना घडत आहेत. विविध राज्यातील सरकारें पाडण्यासाठी केंद्रातील सत्ताधिशांचा हेतू अखेर नित्य ऊघड होत असुन, लोकशाही मुल्यांची हत्या होत आहे.
यास महाराष्ट्राच्या अस्मितेच्या भावनेने शिवछत्रपतींच्या नांवे ऊभारलेल्या शिवसेनेस देखील अभय मिळु नये, ही लोकशाहीची कुचेष्टा व शोकांतिका आहे.. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी शिवसेनेच्या फुटीच्या राजकीय पेचप्रसंगावर बोलतांना दिली..
