‘वी’ने महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांसाठी ४जी नेटवर्क कव्हरेज वाढवले,
आघाडीचा टेलिकॉम ब्रँड वी ने महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आपल्या ४जी अनुभवांमध्ये सुधारणा करून आपल्या ग्राहकांना नेटवर्कचा अधिक चांगला अनुभव व अधिक वेगवान स्पीड्स मिळवण्यासाठी सक्षम केले आहे. आजवर वी ने ६४३० पेक्षा जास्त साईट्सवर अतिशय सक्षम ९०० एमएचझेड स्पेक्ट्रम व १६४५० पेक्षा जास्त साईट्सवर १८०० एमएचझेड बँड तैनात केला आहे ज्यामुळे या दोन राज्यांमधील ७८% लोकांना इमारती, घरांच्या आत काम, अभ्यास, सोशलाईज करताना, मनोरंजनाचा आनंद घेत असताना, ईकॉमर्स आणि इतर डिजिटल सेवांचा वापर करताना अधिक मजबूत नेटवर्कचा अनुभव घेता येत आहे. याखेरीज पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, गोवा आणि इतर महत्त्वाच्या शहरांमधील व्यापारी व निवासी भागांमधील वी ग्राहक इमारती, घरांच्या आत असताना देखील अधिक सुधारित आवाज व डेटाचा अनुभव घेऊ शकत आहेत.
१९०० पेक्षा जास्त टीडीडी साईट्स वाढवल्या गेल्यामुळे मार्च २०१९ पासून ऑगस्ट २०२२ पर्यंत डेटा क्षमता २.८ पटींनी वाढली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना सर्वोत्तम सेवा अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या वीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत:
वी – विश्वसनीय नेटवर्क
· ९०० एमएचझेड, १८०० एमएचझेड, २१०० एमएचझेड, २३०० एमएचझेड, २५०० एमएचझेड या सर्व बँड्सवर १२२.८ एमएचझेड स्पेक्ट्रम असल्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये ही सर्वात मोठी टेलिकॉम सेवा प्रदान करणारी कंपनी बनली आहे. वी कडे या सर्कलमधील सर्वात मोठे ३६.७% ४जी स्पेक्ट्रम होल्डिंग आहे.
· अधिक चांगला सुस्पष्ट आवाज आणि इमारतींच्या आत असताना देखील अधिक चांगला अनुभव यासाठी वी ने दोन राज्यांमध्ये ४जीवर ९०० एमएचझेड स्पेक्ट्रम सर्वात जास्त तैनात केले आहे. याशिवाय या राज्यामध्ये ४जी क्षमता बँड २५०० एमएचझेड असलेले हे एकमेव टेलिकॉम नेटवर्क आहे.
· या दोन्ही राज्यांमध्ये वोल्ट क्षमता दुपटीने वाढवण्यात आली आहे. या नेटवर्क उपक्रमामुळे अधिक जास्त वी ग्राहकांना वोल्ट वापरून कॉल्स करता येणार आणि सुपरफास्ट कॉल कनेक्टसह एचडी क्वालिटी क्रिस्टल क्लियर अर्थात अतिशय सुस्पष्ट आवाजाचा आनंद घेता येणार.
· वी सर्व ३जी ग्राहकांना ४जीमध्ये अपग्रेड करत आहे आणि दोन राज्यांमधील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये स्पेक्ट्रम रीफ्रेम करून ४जी क्षमतेत सुधारणा करत आहे.
वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र व गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड रोहित टंडन यांनी सांगितले, “वी नेटवर्कवर सर्वोत्कृष्ट आणि अपग्रेडेड ४जी अनुभवाचा आनंद घेण्यासाठी मी सर्व प्रीपेड व पोस्टपेड मोबाईल फोन युजर्सना आमंत्रित करू इच्छितो. सर्कलमध्ये आमच्या ४जी कव्हरेजचा विस्तार करण्यासाठी आणि सर्व शहरांमध्ये इनडोर नेटवर्क कव्हरेज मजबूत करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक वेगवेगळे उपक्रम घेतले आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वीच्या ४जी नेटवर्कचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी वी ग्राहक आपल्या सोयीचे प्लॅन्स निवडू शकतात. ५जी साठी सुसज्ज राहण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरूच आहेत, सर्वोत्तम तंत्रज्ञान, उत्पादने आणि सेवा उपलब्ध करवून देऊन जीवनात पुढे जाण्यासाठी ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सादर करण्यात आलेली नाविन्यपूर्ण उत्पादने:
वी कॉलर ट्यून्स
तब्बल ७० पेक्षा जास्त भाषांमधील आणि १० पेक्षा जास्त शैलींमधील आवडीच्या गाण्यांमधून वी युजर्स आपल्या कॉलर्सचे स्वागत करू शकतात. रोमान्स, भक्ती, मेलडी, रिजनल, क्लासिकल या आणि अशा अनेक शैलींमधील गाणी यामध्ये आहेत. वी ग्राहक त्यांच्या हॅलो ट्यून देखील सेट करू शकतात, अनलिमिटेड गाणी डाउनलोड करण्याचा आनंद मिळवू शकतात. यासाठीच्या मासिक प्लॅनची किंमत फक्त ४९ रुपये, तीन महिन्यांच्या प्लॅनची किंमत फक्त ९९ रुपये आणि वार्षिक प्लॅनची किंमत फक्त २४९ रुपये आहे.
खिशात वायफाय – वी मायफाय
आम्ही नुकतेच वी मायफाय लॉन्च केले आहे, ज्यामध्ये एकावेळी १० डिव्हायसेस कनेक्ट होऊ शकतात आणि १५० एमबीपीएसपर्यंत डेटा स्पीड मिळतो. या नव्या उत्पादनामुळे वी ग्राहक प्रवासात असताना देखील हेवी वायफाय स्पीडचा आनंद घेऊ शकतात. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, गोवा (शहरांची नावे) या शहरांमध्ये निवडक स्टोर्समध्ये वी मायफाय उपलब्ध आहे.
प्रीपेड ग्राहकांसाठी हिरो अनलिमिटेड प्लॅन
डेटा कोटा अचानक संपून जाईल अशी चिंता आता अजिबात नको कारण हिरो अनलिमिटेड प्लॅनसोबत मिळत आहेत ३ अनोखे लाभ: अनलिमिटेड हाय स्पीड डेटा फ्रॉम १२ एएम – ६ एएम, वीकएंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट. यामध्ये दैनंदिन कोटाच्या व्यतिरिक्त दर महिन्याला २जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा अनलॉक केला जातो आणि त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. याशिवाय हिरो अनलिमिटेड पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी वी ने २९९ आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे अजून जास्त डेली डेटा अनलिमिटेड रिचार्ज पॅक देखील सादर केले आहेत.
