fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

आजार वाढून गुंतागुंत होण्यापूर्वी वेळीच उपचार करून घ्यावे – डॉ. सनी गुगळे 

पुणे  : ” लोकांच्या मनात ऑपरेशन बद्दल भीती असते, म्हणून डॉक्टरांकडे जाण्यास घाबरतात. सर्व प्रकारच्या व्याधींवर ऑपरेशन हा एकमेव इलाज नसतो. म्हणून लोकांनी आजार वाढून गुंतागुंत होण्यापूर्वी वेळीच उपचार करून घ्यावेत,” असे मत संचेती हॉस्पिटल मधील सर्जन डॉ. सनी गुगळे यांनी व्यक्त केले.
 १२ ऑक्टोबर रोजी जागतिक संधीवात दिन साजरा केला जातो. यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘ डोन्ट डिले, कनेक्ट टुडे ‘ ही संकल्पना निश्चित केली आहे. त्यानिमित्ताने पी. एम. शहा फाउंडेशन, वर्धमान प्रतिष्ठान व संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत अस्थिरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा २५० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन डॉ गुगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पी.एम. शहा फाऊंडेशनचे संचालक अँड चेतन गांधी, डॉ. महावीर दुगड, डॉ अर्पित मुथा, डॉ. नील शर्मा, जनरल मॅनेजर राहुल चौबे, वर्धमान‌ प्रतिष्ठानचे विलास राठोड, जितूभाई ताथेड, सतिश कोंढाळकर, निवेदिता कोंढाळकर, आर.एल. मेहर, रेणूजी भंडारी, नीता मेहता, दिप्ती शहा, रूपल ताथेड, अर्चना लुनावत, यांची विशेष उपस्थिती होती.
अनेकदा उपचार घेण्यासाठी लोक डॉक्टरांकडे जाण्यासाठी घाबरतात, टाळाटाळ करत. शिबिराच्या माध्यमातून डॉक्टरांना रोग्यांकडे घेऊन जाण्याचा उत्तम पर्याय पी.एम. शहा फाउंडेशनने निवडला आहे. या पुढेही आरोग्य संवर्धनाची ही चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा संस्थेचा मानस आहे असे अँड गांधी यांनी सांगितले.
हाडांच्या निकोप वाढीसाठी योग्य आहार, तसेच नियमित व्यायाम आणि चालणे गरजेचे असते. परंतु अज्ञान व अंधश्रध्दा यामुळे लोकांची हाडे ठिसूळ बनत चालली आहेत. लोकांमधील आरोग्याप्रती असणारे अज्ञान दूर करून त्यांना आरोग्याविषयी जागृत करण्याचा उद्देश अशा प्रकारच्या शिबीरांचा असतो असे मत डॉ. महावीर दुगड यांनी व्यक्त केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पी.एम. शहा फाउंडेशनच्या कर्मचारी वर्गाबरोबरच स्वामिनी महिला मंडळ, युवा जागृती महिला मंडळ, लायन्स क्लब मास्टर माईंड ग्रुप, महावीर प्रतिष्ठान, दिपशिखा मंडळ, जैन विमेन्स क्लब व भारती विद्यापीठ समाज विज्ञान केंद्र यांचे विशेष योगदान लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading