Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

प्रभारी कुलगुरू कारभारी काळे यांची रसायनशास्त्र विभागाला भेट

प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाला भेट देत तेथील विद्यार्थी व प्राध्यापकांशी विविध विषयांवर संवाद साधला.

रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.अविनाश कुंभार यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विभागाविषयी माहिती दिली. यावेळी डॉ. काळे यांनी विभागातील सर्व प्रयोगशाळांना भेट देत विभागाची कार्यपद्धती समजून घेतली. तसेच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या. विभागात सुरू असलेले संशोधन आणि उपक्रमांचे कौतुक केले.

कोट
अनेक विभागात खूप चांगले काम सुरू असून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि प्राध्यापक, विद्यार्थ्यांना काय वाटते हे जाणून घेण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
-डॉ.कारभारी काळे, कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading